EKAANT FOREST HOMES, BUNGLOW NO. 17, GAT NO. 1713, VILLAGE - JAMSUT, TAL-GUHAGAR, DIST - RATNAGIRI
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काही वेगळा आराम हवा असतो, शांतता हवी असते. सध्याच्या जगात लोकांचे जीवन फारच कृत्रिम झाले आहे. मनोरंजनाची अनेक साधने अतिशय कमी खर्चात, कमी श्रमात उपलब्ध झाली आहेत. जसे टेलिव्हिजन, मोबाईल, कॉम्प्युटर ही साधने आपापल्या परीने लोकांची सेवाच करीत असतात. त्यांना कोणतेही मनोरंजन कमी पडू नये यासाठी ही साधने खूप झटत असतात. यामध्ये लोकांना हवी असणारी मनःशांती, आराम हे शहरी व इतर भागात मिळू पण शकते, परंतु त्याचा जो दर्जा असतो, तो पाहिजे तसा मिळत नाही. याचे कारण त्यात खूप कृत्रिमता असते; ज्याचा लोकांना अतिशय कंटाळा आलेला असतो. त्यांना काही अशी भौगोलिक जागा हवी असते; जिथे त्यांना खऱ्या अर्थाने मनःशांती मिळेल. जिथे त्यांना असे वाटेल,"अरे ! येथून आपण आता कुठेच जाऊ नये किंवा या ठिकाणी आपण परत ,परत येणार, भेट देत राहणार." आणि ही मनःशांती, आराम, मनोरंजन जर खऱ्या अर्थाने मिळवायचे असेल तर एकच साधन जगात उपलब्ध आहे, आणि ते म्हणजे "निसर्ग". निसर्गाच्या जवळ जाणे हे प्रत्येकाला अपरिहार्य आहे. कारण त्यातून मिळणारे समाधान हे अद्वितीय, अदभूत आहे. हा निसर्ग लोकांना आपल्या जवळ येण्यासाठी खुणावत असतो. लोकांच्या मनावरील दडपण, चित्रविचित्र विचारांचे ओझे, एकदम कमी करायचे असेल तर त्यावर निसर्गाशिवाय दुसरे कोणतेही औषध नाही. टुरिझमच्या माध्यमातून लोकांना निसर्गाबरोबर रहायची, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायची संधी मिळते. त्यातून मिळणारा आनंद , समाधान केवळ अवर्णनीय.
महाराष्ट्राला - गड, किल्ले, पहाड, धबधबे, दऱ्या तसेच मोठा समुद्र किनारा अशी निसर्गाची मोठी देणगी मिळालेली आहे. त्यातही कोकणला असणारे निसर्ग सौन्दर्य केवळ अफलातून !! महाराष्ट्रात असलेल्या निसर्ग सौंदर्य पैकी ५० ते ६० टक्के निसर्ग सौंदर्य कोकणात पाहायला मिळते असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 'गुहागर' तालुका, हा निसर्गाच्या बेसुमार संपत्तीने नटलेला आहे. येथे असलेले सृष्टी सौंदर्य मनाला चांगलीच भुरळ घालते. नागमोडी रस्ते, दुतर्फा असलेली छोटी मोठी झाडे, सुपारीच्या, नारळाच्या बागा, वडाचे, आंब्याचे उंचच उंच आणि मोठे वृक्ष, लाल माती, साधी, पण टुमदार घरे, मंदिरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हेदवी बीच, हेरिटेज गणेश टेम्पल, व्याडेश्वर, दुर्गादेवी मंदिरे, दाभोळ क्रीक, चंडिका मंदिर गुहागर + वेळणेश्वर बीच. अनेक लोक येथे वीकएंड ट्रिपचा आनंद घेत असतात. पुण्या - मुंबईपासून हा परिसर साधारण २५० कि.मी. अंतरावर आहे.

सध्या मेडिटेशन, योगाचा जमाना आहे. लोक आपल्या प्रकृतीबद्दल बरेच जागृत झालेले दिसतात. त्यातच कोरोना सारख्या आपत्तीने लोक आपल्या तब्येतीची खास काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक जण जमेल तसा व्यायाम, योगासने, मैदानी खेळ खेळून आपली प्रकृती मजबूत करीत असतात. पण ह्या सर्वाला जर निसर्गाचे सान्निध्य असेल तर सोन्याहून पिवळे, किंवा दुधात साखर ! भारतीय संस्कृतीमध्ये, योगासने, व्यायाम ह्याच्या बरोबरच, ध्यान धारणेलाही तितकेच महत्त्व आहे.
वरील परिसर हा निसर्गरम्य असल्याने योगा बरोबरच अनेकांना ध्यान धारणेसाठी येथे येणे अतिशय उत्तम असल्याचे जाणवते.
कोकणात येण्यामागे येथील वेगळे खानपान लोकांना जास्त आकर्षित करते. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी उत्तम व रुचकर जेवणाची व्यवस्था, हे कोकणचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकांत फॉरेस्ट होम्स परिसरात राहण्याबरोबरच चहा, कॉफी, नाश्त्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. येथे त्यासाठी एक सुसज्ज कँटीन आहे. आपल्या आवडीप्रमाणे आगाऊ सूचना देऊन टुरिस्ट आपल्या जेवणाचे आयोजन करू शकतात. येथील स्टाफ त्यासाठी कायम तत्पर असतो. ज्यांना फार फिरायला आवडत नाही किंवा काही कारणाने बाहेर फिरता येत नाही त्यांच्यासाठी ह्या परिसरात इनडोअर गेम्सची सोय आहे जर तेथे गेलेल्या टुरिस्टना, तेथील परिसरात फिरण्यासाठी गाडी hire करायची असेल तर management ला आगाऊ सूचना देऊन त्याचीपण सोय केली जाते. शाळा, कॉलेजेस तसेच लोकांचेमैत्री गट, newly married couples या सर्वांसाठी सहल किंवा ट्रीपच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत उत्तम म्हणावा लागेल. जीवनातील अविस्मरणीय क्षण संग्रहित करण्यासाठी या ठिकाणी जरूर भेट द्यावी.
Contact for Booking : Mrs. Ratna Kulkarni - Mob No. 9172574912
Mr. Kishor Kulkarni - Mob No. 9762015198
"EKAANT FOREST HOMES"
Bunglow No. 17, Gat No. 1713, Village Jamsut, Tal - Guhagar, Ratnagiri
In today's stressful life, everyone wants something different, peace. In today's world, people's lives have become very artificial. Many means of entertainment have become available at easily & at very low cost. Devices like television, mobile, computer are serving the people in their own way. These tools work very hard to keep them entertained. In this, people can get the peace of mind and comfort they need in urban and other areas, But he does not get the quality he wants. This is because it contains a lot of artificiality; Which makes people very bored. They want some such geographical, comfort space; Where they will find true peace of mind. Where they will think, "Hey! You shouldn't go anywhere from here or you will come back to this place, keep visiting." And the only tool available in the world, if you want to get this peace of mind, relaxation, entertainment in the true sense, and that is "nature". Getting closer to nature is inevitable for everyone. Because the satisfaction that comes from it is unique, wonderful. This nature signals people to come closer to it. There is no medicine other than nature to reduce the oppression of people's minds, the burden of imaginary thoughts. Through tourism, people get a chance to live with nature and spend time in close proximity to nature. The joy, the satisfaction, is indescribable.
Maharashtra has received great gifts from nature such as forts, mountains, waterfalls, valleys and a large beach. The natural beauty of Konkan is only amazing !! It is safe to say that 50 to 60 percent of the natural beauty in Maharashtra is found in the Konkan.
Guhagar taluka in Ratnagiri district of Konkan is rich in natural resources. The beauty of nature here captivates the mind. Crooked roads, small and big trees on both sides, betel nut, coconut orchards, Bannana trees, tall and big mango trees, red soil, simple but beautiful houses, temples and most importantly nice tourist attractions like Hedvi Beach, Heritage Ganesh Temple, Vyadeshwar, Durgadevi temples, Dabhol Creek, Chandika Temple Guhagar + Velneshwar Beaches. Many people are enjoying weekend trips here.
Ekaant Forest Homes is a village located about 12 km from Sringartali, the main market place.
The area is very rich in nature and very quiet. Many people have taken second home here. Many have just bought plots and planted various trees there. Arecanut, coconut and banana trees are abundant in the area. Bonsai - Small trees are planted here. It is a very large, open and scenic area. The beautiful reddish-brown houses on the stages, the trees around it, the greenery are all very striking. Some have built two-story houses on large plots with open terraces. From it, a beautiful view of the surrounding nature takes place. The main thing is that the weather here is quite cool even in summer. The area is at a long distance from urban congestion, noise and pollution. As the name suggests, solitude here takes you to a different world.
Now is the time for meditation, yoga. People seem to be very aware of their nature. In addition, people with disasters like Corona are trying to take special care of their health. Many people are strengthening their health by exercising, doing yoga, playing outdoor sports. In Indian culture, yoga, along with exercise, is just as important as meditation.
Since the above area is scenic, many people find it great to come here for meditation along with yoga.
After coming to Konkan, the different food here attracts more people. A great and delicious meal for vegetarians and non-vegetarians is a unique feature of Konkan. In addition to living in a secluded Forest Homes area, there are excellent arrangements for tea, coffee, snacks and meals. There is a well-equipped canteen for that. Tourists can organize their meals by giving advance notice as per their liking. The staff here is always ready for that.
If the tourists who have gone there want to hire a car to travel in the area, it is also facilitated by giving advance notice to the management. This part is great for schools, colleges as well as friendship groups of people, from the point of view of a trip. It is a very memorable place to catch the beautiful life moments.
अटी आणि शर्ती :१) सदर एकांत होम्स ऍडव्हान्स बुकिंग ऑनलाईन करावे लागेल. त्यासंबंधीचे details खाली दिलेल्या संपर्क मोबाईल नंबरवर मिळतील.२) येथे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये, जर आपणास (शाकाहारी/मांसाहारी) नाश्ता/जेवण करायचे असल्यास आपले सर्व details येथील संबंधित व्यवस्थापकाला जाण्याआधी द्यावे लागतील. मांसाहारी पदार्थ तेथे असलेल्या उपलब्धतेनुसार देण्यात येतील. त्यासाठी आगाऊ सूचना द्यावी लागेल.३) सदर परिसरात असलेले वृक्ष, वनस्पती तसेच वास्तू यांना कोणतीही इजा पाहोचवू नये, आपण रहात असलेला परिसर स्वच्छ राखावा.४) आपल्याकडे असलेल्या किंमती वस्तू स्वतःच्या जबाबदारीने, लक्षपूर्वक - जपून ठेवाव्यात.५) येथे काही अतिरिक्त सेवा, सुविधा - जसे येथे फिरण्यासाठी guide , गाडी, driver - हवे असल्यास त्यासाठी येथील व्यवस्थापनास आगाऊ कळवावे लागेल.६) येथे बाहेर फिरतांना, परिसराचा नकाशा, माहिती इ. आवश्यक गोष्टी जवळ ठेवाव्यात.येथील परिसरात शक्यतो रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणे टाळावे.7) साधारण आठवड्यासाठी बुकिंग हवे असल्यास कोटेजच्या rent मध्ये १०% सूट मिळेल.8) या परिसरात वास्तव्य करून कोकणच्या या विस्तीर्ण आणि अविस्मरणीय निसर्गाचा आपण निखळ आस्वाद/आनंद घ्यावा. .... धन्यवाद ..!!!
Terms and condition :
1) Ekaant Forest homes are available for rent - One day /night - 24 hours or as per requirement , for booking contact the owner on mobile number below.
2) Break fast, Tea-coffee, Dinner and lunch (both Veg and Non-veg) are available at Restaurant of Ekaant Homes. Prior intimation to Restaurant manager should be given by tourists, if they want to use the restaurant facility of Ekaant homes.
3) No damage should be done to the trees, plants and structures in the area where you live should be kept clean.
4) You have to keep our valuables at our own risk.
5) If you need some additional services, facilities - such as guide, car, driver - you need to inform the management in advance
6) While walking out here, map of the area, information etc. Necessary things should be kept close. Avoid going out till late at night.
7) If
you want booking for week, you will get 10% discount in cottage rent.
8) By
living in this area, you should enjoy the vast and unforgettable nature of Konkan. .... thanks .. !!!
Contact for Booking : Mrs. Ratna Kulkarni - Mob No. 9172574912
Mr. Kishor Kulkarni - Mob No. 9762015198
























Comments
Post a Comment